Dahihandi festival : मनसेचा डोंबिवली पूर्वेतील दहीहंडी उत्सव रद्द!

आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी दिली माहिती


डोंबिवली : बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मनसेने यावर्षी डोंबिवली पूर्वेतील चार रस्तावरील दहीहंडी उत्सव (Dahihandi festival) रद्द करत आहोत अशी घोषणा कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली. परिणामी यावर्षी चार रस्ता येथे मनसेची दहीहंडी उभारण्यात येणार नाही.


याबाबत आमदार पाटील म्हणतात, बदलापूरातील या पीडित दोन कुटुंबांच्या घरात घडलेल्या या प्रकारामुळे ही कुटुंबे दुखी आहेत. यासाठी आपल्या पाठीशी संपूर्ण समाज आहे हे दाखविणे आवश्यक आहे. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मनसे त्यांना साथ देणार असेही पाटील सांगतात.


वर्षोनुवर्षे डोंबिवलीत आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतच असतो पण यावर्षी बदलापूर येथील अशा निंदनीय घटनेचे सावट या उत्सवावर आहे म्हणून बदलापूर, डोंबिवली शहरात मनसेने आयोजित केलेला दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.


बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेबाबत शाळेतील आरोपी नराधमावर गुन्हा दाखल करून घेण्यात मनसेच्या बदलापूरातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत घटनेला वाचा फोडली. अशा घटना होवू नयेत यासाठी मनसेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये जाऊन शाळा व्यवस्थापनांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी, तसेच याविषयी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येक शाळेला एक छापील पत्रक देऊन मनसे पदाधिकारी त्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी शाळा व्यवस्थापनाने करावी म्हणून प्रयत्न करत आहेत.


दरवर्षी पूर्वेकडील चार रस्ता येथील पाटणकर चौकात मनसेच्या माध्यमातून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी या भागातील वाहतुकीत वाहतूक विभागाने बदल केला होता. पण आता दहीहंडी रद्द झाल्याने येथील वाहतूक नेहमीप्रमाणेच राहील असे दिसत आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार

अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ,

धुक्यानं वाट लावली, लखनऊची टी ट्वेंटी रद्द झाली

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील लखनऊचा सामना

राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री

मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना शासकीय कोट्यातल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री

IPL 2026 तब्बल ६७ दिवस चालणार, २६ मार्च ते ३१ मे दरम्यान क्रिकेट सामने होणार

मुंबई : आयपीएल २०२६ तब्बल ६७ दिवस चालणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या तारखांनुसार आयपीएल २०२६ ची सुरुवात २६

धुक्यात हरवली लखनऊची टी ट्वेंटी

लखनऊ : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील आजचा लखनऊ येथे

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी