Modi Express : यंदाही गणेशोत्सवासाठी धावणार 'मोदी एक्सप्रेस'; चाकरमान्यांचा होणार मोफत प्रवास!

जाणून घ्या काय आहे वेळ, तारीख आणि तिकीट बुकींग प्रक्रिया


मुंबई : मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपा (BJP) पक्षाकडून कोकणात 'मोदी एक्सप्रेस' (Modi Express) सोडण्यात येणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ही गणेशभक्तांसाठी अभिनव प्रवास योजना सुरु केली आहे. १२ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास सुरुवातीला बसमार्फत सुरु केला होता, कालांतराने हा रेल्वेप्रवास सुरु केला. दरवर्षीप्रमाणे नागरिकांनी यंदाही या योजनेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन नितेश राणे यांनी केले.


त्याचबरोबर, मोदी एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. त्याचा प्रवास पूर्णपणे मोफत असेल. या गाडीचा संपूर्ण खर्च भाजपाकडून केला जाणार आहे. ही सुविधा फक्त एका दिवसासाठी असून प्रवासादरम्यान गणेशभक्तांना जेवण व पाण्याची सोय देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे.



मोदी एक्स्प्रेस कधी सुटणार?


ही गाडी ४ सप्टेंबर रोजी दादर स्थानकावरील ८नंबर प्लॅटफॉर्मवरुन सकाळी १० वाजता रवाना होणार आहे. या एक्सप्रेसच्या तिकीट बुकींगसाठी प्रवाशांना देवगड, कणकवली, वैभववाडी येथील भाजपाच्या मंडळ अध्यक्षांना संपर्क करावा लागणार आहे. तसेच २८, २९ आणि ३० ऑगस्ट हे तीन दिवस तिकीट बुकींग करु शकणार आहेत.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई