आपल्या घरी किचनमध्ये आपलं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या बऱ्याच गोष्टी असतात. मात्र त्यांबाबत अनेकांना माहीत नसतं. अशीच एक गोष्ट म्हणजे धणे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये धण्याचा चव वाढवण्यासाठी वापर केला जातो. पण याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात. धण्यामध्ये भरपूर मिनरल्स, पोटॅशिअम, व्हिटॅमिन्स, फायबर आणि अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्ही धणे पाण्यात भिजवून हे पाणी प्याल तर तुम्हाला वजन कमी करण्यापासून इतरही अनेक फायदे मिळतील. चला तर जाणून घेऊया धण्याचं पाणी पिण्याचे फायदे…
धण्याच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात ज्यामध्ये फ्लावोलॉयड्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यासाठी धण्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूजही कमी होते.
पहाटे रोज उठून तुम्ही धण्याचं पाणी प्याल तर पचन तंत्र चांगलं राहण्यात मदत होते. धण्याच्या बियांमध्ये अॅक्टिव एंझाइम्स असतात जे पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. धण्याच्या पाण्याचं सेवन केल्याने पोटासंबंधी समस्या होतात जसं की, अॅसिडिटी, पोटदुखीही, आणि गॅस दूर होते.
धन्याच्या पाण्याचं सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहतं. यात फायबर जास्त प्रमाणात असतं. ज्याने वजन कमी करण्यास मदत होते. आणि अन्न पचनास होण्यास मदत होते, व पोट जास्त वेळ भरून राहतं.
धण्यामध्ये फायबर आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असल्यामुळे हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पाणी प्यायल्याने स्ट्रोक, हार्ट अटॅक, सारख्या समस्यांचा धोका उद्भवत नाही.
किडनी साफ होण्यास धण्यांच्या पाण्याची मदत होते, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. तसंच शरीरातले विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…