Sunday, March 16, 2025
Homeक्राईमBadlapur News : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; 'तो' मेसेज पसरवणाऱ्या तरुणीला...

Badlapur News : बदलापूर घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; ‘तो’ मेसेज पसरवणाऱ्या तरुणीला अटक

बदलापूर : बदलापूर येथील आदर्श शाळेतील एका कर्मचाऱ्याने ४ वर्षीय दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Crime) धक्कादायक प्रकार केला होता. याप्रकरणी नागरिकांनी राज्यभरातून संताप व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एकीकडे या अत्याचारप्रकरणी आंदोलने ससुरु असताना दुसरीकडे या घटनेतील पीडित मुलगी आणि तिच्या आईविषयी अफवा (Fake News) पसरवणारा मजकूर सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. मात्र त्याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणारी तरुणी रुतिका (२१) चामटोली गावात राहणारी आहे. हिने पीडित मुलींवर अत्याचार झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईचा उल्लेख करण्यात आला होता. दोघांच्या प्रकृतीविषयीचा मजकूर पोस्टमध्ये होता. दरम्यान, ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्यामुळे नागरिकांकडून संतापाची लाट उसळली होती.

परंतु, याप्रकरणी कडक तपास घेत ठाणे सायबर सेलने तांत्रिक पद्धतीने शोध तिला अटक केली. तिच्याविरोधात अफवा पसरवून समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या पोस्ट दिसल्या तर त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच सदरील पोस्ट शेअर करू नये, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी केले. तर कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -