मेट्रो १ मार्गिकेवरून १०० कोटींहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई : ‘वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्येने १३ ऑगस्ट रोजी पाच लाखांचा टप्पा पार केला. गेल्या १० वर्षांमध्ये ‘मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांची संख्या १०० कोटींच्या घरात पोहोचली आहे.


मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेली ‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. या मेट्रो मार्गिकेला सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. या मार्गिकेची मालकी, देखभाल–संचलनाची जबाबदारी असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) प्रवाशांचा प्रसिसाद वाढावा यासाठी विविध प्रयत्न केले. अनेक सुविधा विकसित केल्या. ‘दहिसर-अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर-गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका सेवेत दाखल झाल्या. या मार्गिका ‘मेट्रो १’शी जोडण्यात आल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून मागील काही महिन्यांपूर्वी प्रवासी संख्या वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच आता ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या साडेचार लाख ते पावणेपाच लाखांच्या घरात पोहोचली. १३ ऑगस्ट रोजी दैनंदिन प्रवाशी संख्येने ५ लाखांचा टप्पा पार केला. ‘मेट्रो १’मधून १३ ऑगस्ट रोजी पाच लाख ३८५ प्रवाशांनी प्रवास केला. ही आतापर्यंतची दुसरी दैनंदिन विक्रमी प्रवासी संख्या होती.


‘मेट्रो १’ मार्गिकेवरील दैनंदिन प्रवासी संख्या वाढत असून आता या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या एकूण प्रवासी संख्येतही वाढ होण्यास मदत झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘मेट्रो १’ मार्गिका सेवेत दाखल होऊन १० वर्षे पूर्ण होत असताना या मार्गिकेवरील एकूण प्रवासी संख्येने ९७ कोटींचा टप्पा गाठला होता. आता अडीच महिन्यांतच एकूण प्रवासी संख्येने १०० कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो