Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात रिअ‍ॅक्टरच्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू

मुंबई: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले येथील फार्मा कंपनीत बुधवारी जोरदार स्फोट झाला. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कमीत कमी ४१ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर लगेचच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिडिया रिपोर्ट्सनुसार अच्युतरपुरम एसईजेड स्थित एका कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. डॉक्टरांच्या टीम जखमींवर उपचार करत आहेत. जखमींचे नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले आहेत. अशात सांगितले गेले की या सर्व घटनेनंतर या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे.



दुपारच्या जेवणाच्या वेळेस घडली दुर्घटना नाहीतर...


कंपनीत ही दुर्घटना दुपारच्या वेळेस घडली नाहीतर खूप मोठी जिवितहानी झाली असते. कारण दुपारच्या वेळेस जेवणासाठी अनेक कामगार बाहेर गेले होते. त्यावेळेस रिअ‍ॅक्टरजवळ कमी कर्मचारी होते.


 


पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा


पंतप्रधानकार्यालयाकडून एक्स पोस्टमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, अनकापल्लीमध्ये झालेल्या फॅक्टरीमध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृत्यूप्रकरणी दु:खी आहे. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांप्रती संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या