Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

  134

कल्याण : बदलापूरमध्ये (Badlapur Crime) शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक शोषण प्रकरणामुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच याप्रकरणातील एक अपडेट समोर आले आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज आरोपीला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर केले.


बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याला मुलींच्या टॉयलेट सफाईचे काम देण्यात आले होते. यावेळी त्याच्याकडून चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. या प्रकरणी दोन चिमुकल्या मुलींनी पालकांना याची माहिती दिली आणि त्याचं वाईट कृत्य समोर आले.


सदर प्रकरणी बदलापूरमध्ये मंगळवारी उद्रेक पाहायला मिळाला होता. या प्रकरणावरून लोकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीने अश्या प्रकारचं अजून काही लैंगिक शोषण किंवा कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तर मुलींना आरोपी काय बोलायचा, त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कोर्टाने २६ तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे



आरोपीची माहिती


आरोपी अक्षय शिंदे याचं वय २४ वर्षांचे असून त्याला सफाईसाठी नेमलेल्या कंपनीने कामावर ठेवलं होतं. आरोपी अक्षय शिंदे १ ऑगस्टला शाळेत कामावर लागला होता. अक्षय शिंदे हा सफाई कर्मचारी होता. अक्षयने १२ तारखेला एका मुलीचा विनयभंग केला त्यानंतर त्याने ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याचे घरच्यांना सांगितलं, त्यानंतर पालक तिला डॉक्टरकडे घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर इजा झाल्याचं सांगितले. असे प्रकरण उघडकीस आले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता