Zeeshan Siddique : वांद्रेतील मोठा आमदार सोडणार काँग्रेसची साथ!

अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स लावल्याने उंचावल्या भुवया


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फूट पडल्याच्या घटनेला एक वर्षाहून अधिक काळ लोटला. या काळात अनेकजणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, बऱ्याच काळापासून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत असलेले वांद्रे येथील काँग्रेसचे आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे अनेकदा स्पष्ट केले. आता मात्र, त्यांच्या एका कृतीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वांद्रे पूर्व येथे अजितदादा आणि त्यांच्या पक्षातील आमदारांच्या स्वागताचे बॅनर्स लावल्यामुळे झिशान सिद्दीकी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यानंतरही झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आता मात्र, वांद्रेमध्ये ठिकठिकाणी लावलेल्या बॅनर्समुळे ते अजितदादांना साथ देण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.


काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत सात ते आठ आमदारांची मते फुटल्यानतंर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या आमदारांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. यामध्ये झिशान सिद्दिकी यांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे.



झिशान सिद्दिकी यांची काँग्रेस युवा शाखेच्या मुंबई विभागाचा अध्यक्ष पदावरून हकालपट्टी


माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर झिशान सिद्दिकी यांची काँग्रेस युवा शाखेच्या मुंबई विभागाचा अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. झिशान यांनी काँग्रेसच्या निर्णयावर कोणतीही अधिकृत सूचना न देता पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप केला होता. झिशान सिद्दीकी यांच्या जागी युवा संघटनेच्या मुंबई युनिटच्या अध्यक्षपदासाठी अखिलेश यादव यांच्या नावाची घोषणा केली. याआधी ते शहरातील एनएसयूआय या पक्षाची विद्यार्थी शाखा प्रमुख होते.

Comments
Add Comment

मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता

मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत

नगर पथ विक्रेता समिती' निवडणूक निकाल होणार जाहीर

मुंबई : नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) शिखर समिती आणि परिमंडळीय समिती निवडणुकीबाबतचा पेच अखेर सुटला आहे. उच्च

महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधीची स्थापना; २० कोटीची तरतूद

राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत “महाराष्ट्र राज्य दिव्यांग

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक तंत्रज्ञानाधारित करणार

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य