Maharashtra Politics : उबाठाच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नकार; निकालानंतरच चेहरा ठरवणार

मुंबई : महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा. (Maharashtra Politics) काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जे नाव पुढे येईल, त्याला पाठिंबा देईन असे विधान उद्धव ठाकरेंनी शुक्रवारच्या मविआच्या मेळाव्यात केले. मात्र, ठाकरेंच्या त्या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नकार घंटा दाखवण्यात आली आहे. महाविकास आघाडी हाच चेहरा असेल. निवडणुकीच्या निकालानंतर बसून चेहरा कोण हे मविआचे आमदार ठरवतील, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.


नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीच हा चेहरा राहील असे आम्ही दोघांनी त्यांना सूचवले. त्यांना ठाकरेंनी पाठिंबा द्यावा. जसे इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढलो तसेच महाविकास आघाडी म्हणून लढू. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आमदार महाविकास आघाडीचे आणायचे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय वरिष्ठांनी करायचा. जो काही निर्णय वरिष्ठ देतील त्यांच्या आदेशाचे पालन सर्वजण करू, असे त्यांनी सांगितले.


तसेच मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री आमदारांमधून निश्चित व्हावा. अजून जागावाटपावर चर्चा नाही. २१ ऑगस्टपासून जागावाटपावर चर्चा होईल. आमच्या सगळ्यांची तयारी आहे. २१ तारखेला जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आज आमचे बोलणे झाले आहे, त्याआधारे फॉर्म्युला ठरेल, असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले.


दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते. लोकसभेतही ते सर्व महाराष्ट्रभर फिरलेत. त्यामुळे प्रचार करण्याचं काम त्यांनीच केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते यांनी प्रचार केला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात वाद नाही. योग्यवेळी त्याबाबतीतले निर्णय होतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राहिलेत त्यामुळे काहींच्या जागा त्या स्तरावर आहेतच असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.



शिवसेना शिंदे गटाचा ठाकरेंना टोला


लाचारी किती असावी याचे ज्वलंत उदाहरण आज पाहायला मिळाले. प्रास्ताविक उद्धव ठाकरेंनी करावे त्यात येणारा मुख्यमंत्री तुम्ही सांगावे, माझ्या त्याला पाठिंबा आहे असे सांगूनही महाविकास आघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे या मशालीची आग स्वत:च्या बुडाला लावून घेतली की काय असे चित्र त्यातून उभे राहते. त्यामुळे आपल्याच मशालीने शिवसैनिकांचे घर जाळणारे तुम्ही आहात असा टोला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा