मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष गाडी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सकाळी १२.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. येताना १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून दुपारी १. ३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता पोहोचेल. हि गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल .
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – मडगाव विशेष
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून गुरुवार १५ ऑगस्ट आणि शनिवार १७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल. येताना मडगाव येथून शुक्रवार १६ ऑगस्ट आणि रविवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १२.४० वाजता पोहोचेल.
हि गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर , खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड , संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, आणि कणकवली येथे थांबेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर विशेष
मंगळवर २० ऑगस्ट रोजी सकाळी १२.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी दुपारी १ . ३० वाजता पोहोचेल. रविवार १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १. ३० वाजता पोहोचेल.
हि गाडी कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज येथे थांबेल .
पुणे – नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेष
गुरुवार १५ ऑगस्ट रोजी पुणे येथून संध्याकाळ ४. १० वाजता सुटेल आणि १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथे ६.३० वाजता पोहोचेल. बुधवार १४ ऑगस्ट आणि शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून संध्याकाळी ७. ४० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल. हि गाडी उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.
कलबुर्गी – बेंगळुरू विशेष
गुरुवार १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवारी १७ ऑगस्ट रोजी रोजी कलबुरगि येथून सकाळी ९. ३० वाजता सुटेल श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी बुधवार १४ ऑगस्ट शुक्रवार १६ ऑगस्ट आणि गुरुवार १७ ऑगस्ट रोजी श्री एम विश्वैसरया टर्मिनल, बेंगळुरू येथून २१.१५ वाजता सुटेल आणि कलबुरगि येथे ७.४५ वाजता पोहोचेल.
हि गाडी शाहबाद, वाडी, यादगिर, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनि, गुंटकल, अनंतपूर, धर्मवरम आणि यलहंका येथे थांबेल.
या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कासह वरील सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग आधीच सुरू आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…