एक रूपयात एक दिवसाची व्हॅलिडिटी आणि भरपूर डेटा, BSNLने लाँच केला जबरदस्त प्लान

मुंबई: खाजगी कंपन्यांचे रिचार्ज प्लान महाग झाल्यानंतर आता BSNL बाजारात पुनरागमन करत आहे. BSNL सातत्याने स्वस्त प्लान लाँच करत आहे. एक महिन्याच्या आत कोट्यावधी लोकांनी BSNLमध्ये आपला नंबर पोर्ट केला आहे. BSNLचे प्लान खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. दरम्यान, ४जी लाँच केल्यानंतर बीएसएनएलचे कव्हरेजही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत चांगले होण्याची आशा आहे.


यातच बीएसएनएलने असा प्लान लाँच केला आहे की यात एक रूपयाला एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानसोबत डेटाही मिळतो. जाणून घेऊया या प्लानबद्दल...



BSNLने सादर केला ९१ रूपयांचा प्लान


BSNLचा १०० रूपयांच्या आतील प्लान जबरदस्त आहे. यातच कंपनीने ९१ रूपयांचा आणखी एक प्लान सादर केला आहे. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. खास बाब म्हणजे केवळ १ रूपयांत एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळते. बीएसएनएलचा हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे. या प्लानअंतर्गत १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येते. सोबतच ११ पैसे दराने १ एमबी डेटा मिळेल.



१०७ रूपयांच्या प्लानमध्ये मिळणार हे फायदे


बीएसएनएलकडे १०७ रूपयांचा प्लान आहे. यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग नाही तर सर्व नेटवर्कवर २०० मिनिटचे कॉलिंगचे फायदे मिळतात. सोबतच या प्लानमध्ये ३५ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत

प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत

वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली

राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षम मुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या

रविवारी तिन्ही मार्गांवर मोठा ब्लॉक

मुंबई : आज आणि उद्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला असून लोकल

राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी

वाहतुकीच्या कोंडीत भर, अपघाताची भीती मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि

पूर्व उपनगरातील एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

कुर्ला पश्चिम ते घाटकोपर पश्चिमपर्यंत उड्डाणपूल सचिन धानजी मुंबई : पूर्व उपनगरातील कुर्ला पश्चिम कल्पना