Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचा दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Meeting) मंगळवारी झालेल्या बैठकीत शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.


राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण ८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने १४९ कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला आहे.



कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेले ८ मोठे निर्णय



  • विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार १४९ कोटीस मान्यता (पशूसंवर्धन व दुग्धविकास)

  • मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय लाखो नागरिकांना लाभ ( महसूल विभाग)

  • डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

  • यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील (सहकार विभाग)

  • शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन(वैद्यकीय शिक्षण विभाग)

  • सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता(सार्वजनिक बांधकाम विभाग)

  • नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष (नगरविकास विभाग)

  • सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार (ऊर्जा विभाग)

Comments
Add Comment

थकीत ₹५००० कोटी दंड वसुलीसाठी फडणवीसांची 'कठोर' घोषणा; लवकरच नवी पॉलिसी

नागपूर : विधान परिषदेत आज टू-व्हीलर पार्किंग आणि वाहनधारकांकडून थकीत चालान वसूल करण्याच्या प्रश्नावर

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी