मुंबई: पाकिस्तानने भले आपल्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अर्शद नदीमवर बक्षिसांचा तसेच रोख रकमेचा वर्षाव केला असेल मात्र नदीमला त्याच्या सासरकडून दिल्या जाणाऱ्या गिफ्टची चर्चा अधिक होत आहे. अर्शद नदीमला त्याच्या सासरकडून म्हैस गिफ्ट म्हणून दिली जाणार आङे. ग्रामीण भागात असे गिफ्ट म्हणजे परंपरेचा भाग आहे.
एजन्सीच्या माहितीनुसार रविवारी गावातील स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, अर्शद नदीम यांचे सासरे मोहम्मद नवाज म्हणाले की त्यांच्या गावात म्हैस गिफ्ट म्हणून देणे हे अतिशय मौल्यवान आणि सन्मानजनक मानले जाते.
अर्शदने पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भालाफेकमध्ये ९२.९७ मीटर दूर भाला फेकत मोठा ऑलिम्पिक रेकॉर्ड केला आहे. तर दुसऱ्या स्थानावर भारताचा नीरज चोप्रा राहिला.
अर्शदचा प्रवास खडतर
मोहम्मद नवाज म्हणाले, नदीमला आज कितीही प्रसिद्धी मिळाली असली तरी त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहेत. त्याचे घर अजूनही त्याचे गावच आङे आणि आजही तो तेथे आई-वडिल आणि भावांसोबत राहतो. मोहम्मद नवाज यांच्या लहान मुलीचे लग्न अर्शदही झाले. अर्शद आणि आयशा यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.