Anganwadi Sevika Strike : मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांचा पुन्हा ठिय्या; आझाद मैदानात उतरला लाखोंचा समुदाय!

मुंबई : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांसंर्दभात (Anganwadi Sevika) मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप (Strike) पुकारला आहे. याआधी ४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी राजव्यापी संप केला होता. मानधनात दरमहा ५ हजार रूपये वाढ होईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र अद्यापही पगारवाढीसंदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.


मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी पुन्हा आक्रमक रुप धारण केले आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आजपासून संपावर जाणार आहेत. तर येत्या २१ ऑगस्ट रोजी सेविका सरकार विरोधात मोर्चा काढणार असून यामध्ये २ लाख अंगणवाडी सेविका सहभागी होणार आहेत.



काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या?



  • मानधनात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा.

  • कायदेशीररित्या ग्रॅच्युइटी देण्यात यावी.

  • मान्य केल्याप्रमाणे मासिक पेन्शन योजना लागू करावी.

  • प्रलंबित प्रस्ताव तत्काळ मान्य करावा.




Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती