छोट्याश्या डोंगरी सुभा गावच्या सुपुत्राची गगनभरारी.... तन्मय रुपेश शेळकेची भारतीय वायुसेनेच्या "अग्निवीर" पदी नियुक्ती ....

राजपुरी ग्रामपंचायत व डोंगरी सुभा यंगस्टार मंडळातर्फे सन्मान ....


मुरुड,प्रतिनिधी (संतोष रांजणकर)-  मुरुड तालुक्यातील राजपूरी ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरीसूभा गावाचा सुपुत्र तन्मय रुचिता रुपेश शेळके याची भारतीय देशसेवेत वायुसेनेच्या अग्नीवीर पदी नियुक्ती झाल्याबद्दल राजपूरी ग्रामपंचायत व डोंगरीसुभा यंगस्टार मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


सरपंच सुप्रिया गिद्दी यांनी कुमार तन्मय याची वायुसेनेच्या अग्नीवीर पदी नियुक्ती करण्यात आल्याने डोंगरीसुभा गावाचे नाव उज्ज्वल केले असे सांगून त्याला उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या तर उपसरपंच इस्माईल जुबेर सिद्दीकी यांनी तन्मय याचा ग्रामपंचायत स्तरावर उचीत सन्मान करण्याचा मनोदय व्यक्त करुन त्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत सदस्य हेमंत नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात तन्मयचे कौतुक केले.


राजपुरी ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया गिद्दी, उपसरपंच इस्माईल जुबेर सिद्दीकी, सदस्य हेमंत नाईक, तन्मय चे आजोबा रविंद्र शेळके,आजी वर्षा शेळके, वडील रुपेश शेळके,आई रुचिता शेळके, चुलत आजोबा सुनील शेळके कुटुंबिय तसेच यंग स्टार मंडळाचे अ. हीरा चंद्र खेऊर जयेश भोसले अभिजित जाधव, रूणाल नाईक, नितीन चाफीलकर, अमोल मिरजणकर, निखिल चाफीलकर, सतेज मिरजणकर ,किरण शेळके, कुणाल शेळके, अमोल जाधव यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी