पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ही स्पर्धा भारतासाठी मिळतीजुळती राहिली. भारतीय खेळाडूंनी या महाकुंभात ६ पदके जिंकली. एकूण ११७ भारतीय खेळाडू यावेळेस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. मात्र भारताच्या खात्यात केवळ ६ पदकेच आली. सातव्या पदकाबाबतचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे. विनेश फोगाट कुस्तीसाठीच्या खेळासाठी अपात्र ठरल्यानंतर तिने रौप्य पदक दिले जावे अशी मागणी केली होती.याचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे.
भारताने ६ पैकी ५ कांस्यपदके पटकावली तर एक रौप्य पदक पटकावले. हे रौप्य पदक भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये पटकावले. दरम्यान, यावेळेस भारताच्या खात्यात एकही सुवर्णपदक आले नाही. याआधी टोकियोमध्ये भारताच्या खात्यात एक सुवर्णपदक आले होते. याआधी टोकियोमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती. दरम्यान, आता हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे की फोगाटच्या निर्णयाने भारताच्या खात्यात ७ पटके येतात की नाही.
१० मीटर एअर पिस्टोल – मनू भाकर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले मनू भाकरने. तिने महिला १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात हे पदक मिळवले होते.
१० मीटर एअर पिस्टोल मिक्स टीम- मनू भाकर- सरबज्योत सिंह
१० मीटर एअर पिस्टोल मिक्स टीमने कांस्यपदक मिळवत भारताला ऑलिम्पिकमधील दुसरे पदक मिळवून दिले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी हे पदक मिळवून दिले.
स्वप्नील कुसळे – ५० मीटर रायफल थ्री पोझिशन
भारताला तिसरे पदक(कांस्यपदक) नेमबाजीतच मिळाले. स्वप्नीलने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले होते.
हॉकी संघ
भारतीय हॉकी संघाने टोकियोमधील कामगिरीची पुनरावृत्ती करताना पुन्हा कांस्यपदक पटकावले. त्यांनी भारताच्या खात्यात चौथे पदक टाकले.
भालाफेक – नीरज चोप्रा
भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक पटकावले. त्याने भारतासाठी पाचवे पदक मिळवून दिले.
कुस्ती – अमन सेहरावत
भारताच्या खात्यात सहावे पदक हे पुरुष पेहलवान अमन सेहरावतने टाकले होते. अमनने कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.