Vijay Kadam : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचे निधन!

मराठी कलाविश्वावर पसरली शोककळा


मुंबई : मराठी चित्रपट असो वा मालिका वा नाटक, प्रत्येक गोष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचं आज १० ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विजय हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


विजय कदम यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर त्यांनी नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली होती. मात्र, आज सकाळी त्यांचं निधन झालं. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.


विजय दत्ताराम कदम यांनी १९८० च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. लहानपणी 'राजा भिकारी माझी टोपी चोरली' या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. 'विच्छा माझी पुरी करा', 'रथचक्र', व 'टूरटूर' ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. तर 'हळद रुसली कुंकू हसलं' आणि 'चष्मेबहाद्दूर' या सिनेमांतील त्यांचं कामही प्रचंड गाजलं.



कसा होता विजय कदम यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवास?


मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विजय कदम रंगभूमीचा मार्ग निवडला. विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. 'टूरटूर' या नाटकाने त्यांना लोकमान्यता, तर 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाने राजमान्यता मिळवून दिली. या नाटकाचे विजय कदम यांनी १९८६ पासून ७५० हून जास्त प्रयोग केले.


दरम्यान, मराठी चित्रपट क्षेत्रावरही त्यांनी स्वतःची पकड मजबूत ठेवली होती. 'चष्मेबहाद्दूर', 'पोलीसलाईन', 'हळद रुसली कुंकू हसलं' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री