Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या मेळाव्याआधी विरोधकांकडून डिवचणारे पोस्टर्स!

  148

पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन करण्यात आली टीका 


ठाणे : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आज याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मेळावा आयोजित केला आहे. मात्र, या मेळाव्यापूर्वीच ठाण्यामध्ये ठाकरेंच्या विरोधकांकडून त्यांना डिवचणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. सोबतच या पोस्टर्सवर 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' असं लिहिण्यात आलं आहे.


उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडकरी रंगायतन येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे होर्डिंग अनेक ठिकाणी लागले आहेत. ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


दरम्यान, हे बॅनर्स कोणी लावले हे समोर आले नसले तरी या बॅनर्समुळे ठाण्यामध्ये राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०