Ravindra Waikar : नवी मुंबई एअरपोर्टला दी.बा.पाटील नाव द्या!

खासदार रविंद्र वायकर यांची मागणी


नवी मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विमानतळ विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स सांगितले. त्यामध्ये नवी मुंबई येथे विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई विमानतळावरील विमानांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) बांधकाम सुरु करण्यात आले. दरम्यान, सध्या हे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असून याबाबत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यातच खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.


खासदार रवींद्र वायकर यांनी नवी मुंबईतील विमानतळाला 'दी.बा.पाटील' नाव देण्याची मागणी केली आहे. या विमानतळाचे काम कधी पूर्ण होणार याबाबतची स्पष्टता अद्यापही मिळाली नाही. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार या विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून विमानतळाला दि .बा.पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती देखील वायकर यांनी केली आहे.


दरम्यान, या विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असून त्याचा व्यावसायिक वापर मार्च २०२५ पासून होण्याच्या तयारीत आहे. तर २०४० पर्यंत या विमानतळाचे पाचही टप्पे कार्यान्वित होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात