Hair care : केस घनदाट होण्यासाठी दररोज खा 'हे' पदार्थ

मुंबई: प्रत्येक महिलेला वाटते की आपले केस लांब आणि घनदाट असावेत. मात्र ज्यांचे केस पातळ असतात ते केस निरोगी आणि घनदाट बनवण्यासाठी विविध उपाययोजना करत असतात. केस लांब, घनदाट आणि मजबूत करण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. काही गोष्टींचा आपल्या डाएटमध्ये समावेश केल्यास तुम्ही घनदाट केस मिळवू शकता.



अंडी


केसांना पुरेसे प्रोटीन देण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता. प्रोटीनने भरपूर असलेल्या अंड्याचा डाएटमध्ये समावेश केल्यास फायदा होतो. तुम्ही दररोज नाश्त्यामध्ये अंडी खाऊ शकता. तसेच संध्याकाळच्या वेळेसही अंड्याचे सेवन केले जाऊ शकते.



पालक


केसांसाठी पालक खाणे फायदेशीर आहे. कारण पालकामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. शरीरात आर्यनची कमतरता असल्यास केस गळू लागतात. यामुळे डाएटमध्ये लोहचा समावेश करा.



ड्रायफ्रुट्स


केसांच्या चांगल्या वाढीसाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करणे चांगले असते. जसे बदाम, अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण भरपूर असते.



आंबट फळे


व्हिटामिन सी शरीरात आर्यन शोषण्यास मदत करतात. यामुळे आपल्या डाएटमध्ये आंबट फळांचा समावेश करावा.



गाजर


व्हिटामिन ए ने भरपूर गाजर केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहे. व्हिटामिन ए स्काल्पला नैसर्गिक सीबम बनवण्यास मदत करतात. तसेच केसांची मुळेही निरोगी ठेवतात.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे