मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात श्रीलंकेत वनडे मालिका गमावली आहे. या दौऱ्यात टी-२० मालिकेत भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात यजमानांना धूळ चारली. वनडेत टीम इंडियाने केलेले प्रयोग अयशस्वी ठरले.
भारताचे धुरंधर श्रीलंकेच्या स्पिन हल्ल्यासमोर सरेंडर करताना दिसले. टी-२० वर्ल्डकप ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाची ही पहिली मालिका होती. श्रीलंकेनंतर भारतीय संघ आता बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशचा हा भारत दौरा आहे.
भारतीय संघ या वर्षी वनडे सामने खेळणार नाही. भारत आणि बांग्लादेश यांच्यात २ कसोटी आणि ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवला जाईल. तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये २७ सप्टेंबरला होईल.
कसोटीनंतर टी-२० मालिकेची सुरूवात होईल. मालिकेतील पहिला टी-२० सामना धरमशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये खेळवला जाईल. मालिकेतील दुसरा टी-२०सामना ९ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये होईल तर तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना १३ ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित होईल.
टीम इंडिया आपल्या घरी बांगलादेशविरुद्ध मालिका खेळल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारतासोबत कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येत आ
न्यूझीलंडचा भारत दौरा
हे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबरला बंगळुरूच्या केएम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. तर २८ ऑक्टोबरला दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगेल.