चंदीगढ : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत (Paris Olympics 2024) अंतिम फेरीत पोहोचूनही सामन्याच्या दिवशी ५० किलोहून १०० ग्रॅम वजन अधिक आढळल्याने भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) अपात्र ठरली. रौप्यपदक निश्चित झाल्यानंतरही अशा प्रकारे झालेली निराशा भारतीयांच्या चांगलीच जिव्हारी लागली. यामुळे धक्का बसलेल्या विनेशने कुस्तीतून तिची निवृत्ती जाहीर केली. असं असलं तरी विनेशने आतापर्यंत न खचता केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीयांच्या नजरेत तिचं स्थान उंचावलं आहे. मूळची हरियाणाची (Haryana)असलेल्या विनेशसाठी हरियाणा सरकारनेही तिच्या मेहनतीची जाण ठेवून तिचा खास सन्मान करण्याचं ठरवलं आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी एक्स पोस्टद्वारे विनेशचं कौतुक करत तिला १.५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी एक्स पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, ‘हरियाणाची आमची शूर मुलगी विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती कदाचित ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी देखील ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल.’
‘हरियाणा सरकार ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेत्याला जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देतात. ते विनेश फोगाटच्या कृतज्ञतेसाठी दिले जाईल.’, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हरियाणामध्ये सिल्वर मेडल जिंकण्यासाठी सरकार १.५ कोटी रुपयांचे बक्षीस देते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आता विनेश फोगाटला १.५ कोटींचे बक्षीस मिळणार आहे.
नवी दिल्ली: आयपीएलच्या (IPL 2025) पहिल्या विजेत्या राजस्थान रॉयल्सवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. लखनौ…
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…