Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवारांना उत्तरासाठी मुदतवाढ!

MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवारांना उत्तरासाठी मुदतवाढ!

सर्वोच्च न्यायालयाने दिला 'इतका' अवधी


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या (NCP) फुटीनंतर कोणाचा पक्ष खरा यासोबतच आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) मुद्दा निकालात येणं बाकी आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदारांबद्दल शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला होता. नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर खरी राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची असल्याचा निकाल देत कोणत्याही गटाचे आमदार अपात्र ठरवले नाहीत.


राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची याचिका एकाच दिवशी ऐकू असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. तसंच अजित पवारांसह त्यांच्यासोबत गेलेल्या ४१ आमदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळेस अजित पवारांनी कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख (मेंशन) कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता अजित पवार गट नेमकं काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment