मुंबई : मुंबईत घराच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे अशक्य होते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सिडकोसह (Cidco) म्हाडाच्या (Mhada Lottery) घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे दरवर्षी म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी विविध भागात घरे उपलब्ध करुन दिली जातात. गतवर्षीही म्हाडाने तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. त्याचा उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही म्हाडाने मुंबईत घरांसाठी लॉटरी काढली आहे. यंदा म्हाडा मुंबईतील विविध भागात २हजार ३० घरांची लॉटरी जारी करणार आहे. तर यामध्ये मध्यम गटासाठी सर्वाधिक घरे असणार आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाकडून येत्या दोन दिवसांत लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने अर्जविक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार असल्यामुळे १३ सप्टेंबर रोजी घरं सोडतीची तारीख असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे.
दरम्यान, म्हाडाने यंदा गोरेगाव, पवई, विक्रोळी या भागातील घरांचा समावेश सोडतीत केला आहे. या घरांसाठी अर्जदार म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकणार आहेत. त्यासाठी अर्जदारांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…