CM Eknath Shinde : बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे अथक प्रयत्न

करणार 'या' उपाययोजना


मुंबई : बांगलादेशात सध्या मोठी खळबळ (Bangladesh violence) माजली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलक प्रचंड हिंसक झाले असून त्यांनी राजीनामा देऊन देश सोडून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचं शासकीय निवासस्थान लुटलं आहे. एवढंच नव्हे तर हल्लेखोर लाठ्या घेऊन थेट तुरुंगातही घुसले आणि त्यांनी कैद्यांना बाहेर काढलं. यामुळे सुमारे ५०० कैदी तुरुंगातून पसार झाले आहेत. यात दहशतवाद्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्वाची पावले उचलली आहेत.


बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे.


या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे अथक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क देखील साधला आहे.



परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद


मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधत प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे तसेच भारतात परत येण्यासाठी लवकरात लवकर व्यवस्था करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली आहे.



कोणत्या उपाय योजना करणार?


तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवून आणि त्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधून मदत करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.



काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसमवेत सक्षमपणे उभे आहे.

Comments
Add Comment

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था