Ajit Pawar : अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख!

लाडकी बहीण योजनेवरुन टीका करणार्‍या विरोधकांना अजित पवारांचं चोख प्रत्युत्तर


मुंबई : राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Ladki bahin yojana) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेला राज्यभरातील महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही योजना केवळ निवडणुकीकरता आणली असून ती टिकणारी नाही असा सूर विरोधकांनी लावला आहे. यावर उपमुख्यमंत्री आणी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे. 'अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे', असं म्हणत अजित पवारांनी या योजनेला अधिकाधिक निधी मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं आहे.


अजित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ''माझी लाडकी बहीण योजना' टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे', असं म्हणत अजितदादांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.



योजनेचा अर्ज करण्यासाठीही केली मुदतवाढ


महाराष्ट्र सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारने या योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.




Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना