Pooja Khedkar : उमेदवारी रद्द प्रकरणी पूजा खेडकरची उच्च न्यायालयात धाव!

  108

यूपीएससीच्या निर्णयाला कोर्टात देणार आव्हान 



नवी दिल्ली : यूपीएससीमध्ये निवड होण्यासाठी केलेल्या कारनाम्यांमुळे पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रचंड चर्चेत आल्या. याच प्रकरणी भारतीय लोकसेवा आयोगाने (Public service commissions in India) कारवाई करत पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली तसंच भविष्यात सर्व परीक्षा/निवडींमधून तिला कायमचं काढून टाकलं. यावर यूपीएससीने पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावत ३० जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता. मात्र, उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने तिची उमेदवारी रद्द केली. आता या निर्णयाविरोधात पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेत याचिका दाखल केली आहे.


पूजा खेडकरवर यूपीएससीने कारवाई केल्यानंतर आता पोलीस तिच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता. यूपीएससीने आता पूजा खेडकरचं पद काढून घेतलं असून तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही.


UPSC ने काय म्हटलं? 



UPSC सन २००९ ते २०२३ या दरम्यान पंधरा हजारांहून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या CSE डेटाचा आढावा घेतला. त्यामध्ये उपलब्ध नोंदींच्या तपासणीनंतर UPSC ला पूजा खेडकर या CSE-२०२२ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्या.


१) १८ जुलै २०२४ रोजी नागरी सेवा परीक्षा-२०२२ (CSE-2022) च्या प्रशिक्षणार्थी IAS कु. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कारणे दाखवा नोटीस (SCN) जारी केली होती. खोट्या प्रमाणपत्रांसह परीक्षा नियमांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली होती. या कारणे दाखवा नोटीसला पूजा खेडकर यांनी २५ जुलै २०२४ पर्यंत उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु, पूजा खेडकर यांनी ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत आणखी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. जेणेकरून त्यांना आवश्यक कागदपत्रे गोळा करून नोटीसला उत्तर देता येईल.


२)  UPSC ने कु. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या विनंतीचा काळजीपूर्वक विचार केला आणि न्यायाच्या दृष्टीने त्यांना ३० जुलै २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला. त्यावेळी UPSC ने कु. पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना ही त्यांच्यासाठी शेवटची आणि अंतिम संधी असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते आणि यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही, असंही नमूद करण्यात आलं होतं. ३० जुलैपर्यंत दुपारी ३ पर्यंत प्रतिसाद न मिळाल्यास, UPSC पूजा खेडकरांकडून कोणताही संदर्भ न घेता पुढील कारवाई करेल, असे स्पष्ट शब्दांत त्यांना सांगण्यात आले होते. मात्र मुदतवाढ देऊनही त्यांनी विहित वेळेत त्यांचे स्पष्टीकरण सादर करू शकल्या नाहीत.


३)  UPSC ने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आहेत आणि CSE-2022 नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर या दोषी आढळल्या आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांची CSE-2022 साठीची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना UPSC च्या भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे.


४) पूजा खेडकर यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, UPSC ने २००९ ते २०२३ पर्यंत म्हणजेच १५ वर्षांसाठी CSE च्या अंतिम शिफारस केलेल्या १५,००० उमेदवारांच्या उपलब्ध डेटाची सखोल तपासणी केली आहे. या सविस्तर अभ्यासानंतर पूजा खेडकर यांचे प्रकरण वगळता, इतर कोणत्याही उमेदवाराने CSE नियमांनुसार परवानगीपेक्षा जास्त प्रयत्नांचा लाभ घेतल्याचे आढळले नाही.


पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या एकमेव प्रकरणात UPSC ची मानक कार्यप्रणाली (SOP) तिच्या प्रयत्नांची संख्या शोधू शकली नाही. कारण तिने केवळ तिचे नावच नाही तर तिच्या पालकांचे नाव देखील बदलले आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी UPSC SOP अधिक मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहे.


५) खोटी प्रमाणपत्रे (विशेषत: OBC आणि PwBD श्रेणी) सादर करण्याच्या तक्रारींचा संबंध आहे. UPSC हे स्पष्ट करू इच्छिते की ते प्रमाणपत्रांची केवळ प्राथमिक छाननी करते. सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र जारी केले आहे की नाही, प्रमाणपत्र ज्या वर्षाशी संबंधित आहे, प्रमाणपत्र जारी करण्याची तारीख, प्रमाणपत्रावर काही ओव्हरराईटिंग आहे की नाही, प्रमाणपत्राचे स्वरूप इत्यादी.


जर हे सक्षम प्राधिकाऱ्याने ते प्रमाणपत्र जारी केलं असेल तर ते खरे मानलं जातं. UPSC कडे उमेदवारांनी दरवर्षी सादर केलेल्या हजारो प्रमाणपत्रांची सत्यता तपासण्याचा आदेश किंवा साधन नाही.
Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके