पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये बॅडमिंटनमद्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. लक्ष्य सेनकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र लक्ष्य सेनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली आणि पदक आपल्या नावे केले.
लक्ष्य सेनला सेमीफायनलमध्ये पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे कांस्यपदक जिंकण्याची आशा प्रत्येक भारतीयाला लागून राहिली होती. त्या दिशेने लक्ष्यने खेळही केला मात्र त्याला खेळात सातत्य राखता आले नाही आणि पदरी निराशा आली. मलेशियाच्या जी जियाने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये जबरदस्त खेळ करत कांस्यपदक मिळवले.
लक्ष्य सेनने पहिला गेम सहज जिंकला. मात्र मलेशियाच्या ली जी जियाने दुसरा आणि तिसरा गेम जिंकत भारताच्या आशांवर पाणी फिरवले.