पुढे जे घडलं ते वाचून अंगावर येतील शहारे…
घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर
सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर स्टंटबाजी (Social media stunts) करण्याच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यात अनेक तरुणांचा जीवही गेला. अशा धक्कादायक घटना घडत असतानाही काही तरुणांना मात्र उंच कड्यावरुन सेल्फी (Selfie) आणि व्हिडीओ काढायचा मोह आवरत नाही. आता साताऱ्यातून (Satara news) देखील अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात तरुणी उंच कड्यापाशी जाऊन सेल्फी काढायला लागली आणि तिचा तोल गेल्याने ती २५० फूट दरीत कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून ४० फूट खाली कोसळल्यानंतर ती एका झाडात अडकली आणि तिचा जीव वाचला. मात्र, घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील ठोसेघर येथील सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात ‘मंकी पॉईंट’ परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी संततधार पाऊस सुरू असल्याने जमीन अतिशय निसरडी झाली आहे, त्यामुळे ही घटना घडली. डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका मुलीचा तोल गेला आणि ती २५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, ४० फुटावर ती एका झाडात अडकली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. तिला साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दुखापत झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे सेल्फीचा मोह जीवावर बेतू शकतो, याचा धडा तरुण पिढीने घेणं गरजेचं आहे.
घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात दिसत आहे की, रेस्क्यू टीमचे सदस्य तरुणीला वर घेऊन येत आहेत. यावेळी ती जखमी झाली असून, तिला नीट उभे राहणेही जमत नाही आहे. वर येतानाच ती दोन वेळा पुन्हा खाली पडताना ओरडताना दिसत आहे. यावेळी रेस्क्यू टीममधील सदस्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून या तरुणीला बाहेर काढले आहे.
View this post on Instagram