Wednesday, March 19, 2025
Homeक्रीडाParis Olympics 2024 : ब्रिटनला धूळ चारत ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची उपांत्य...

Paris Olympics 2024 : ब्रिटनला धूळ चारत ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक!

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) भारताने शानदार कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी संघाने (Team Hockey India) पेनल्टी शुट आऊटमध्ये ग्रेट ब्रिटनला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत करत उपांत्य फेरीत थाटात एंट्री केली आहे. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेतील सेमीफानयलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची उपांत्य फेरीतील लढत आता ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताने ग्रेट ब्रिटनला ४-२ अशा फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केल्याने मॅचचा निकाल पेनल्टी शुट आऊटद्वारे लावण्यात आला. भारताचा गोलकीपर श्रीजेश याने जोरदार बचाव केल्याने आणि भारताच्या हॉकी खेळाडूंनी पेनल्टी शुट आऊटमध्ये ४ गोल केल्याने ब्रिटनला पराभवाचा धक्का बसला.

कसा रंगला सामना?

ग्रेट ब्रिटन आणि भारत यांच्यातील मॅचमधील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. १७ व्या मिनिटाला अमित रोहिदासला रेड कार्ड मिळालं त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला १० खेळाडू घेऊन लढावं लागलं. कारण सामन्यातील सामन्यातील २२ व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करण्यात आलाय. भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर हरमनप्रीत सिंगने पहिला गोल केला. यासह भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फार काळ टिकली नाही. सामन्यातील २७ व्या मिनिटाला, मॉर्टन ली ने गोल केला आणि ग्रेट ब्रिटनला १-१ च्या बरोबरीत आणलं.

सामना बरोबरीत सुरु होता, मात्र दोन्ही बाजूंनी जोरदार आक्रमण सुरु होतं. भारताची भिंत श्रीजेश यावेळीही ढाल बनून उभी होती. त्याने ब्रिटेनकडून येणारा एकही चेंडू गोल पोस्टमध्ये जाऊ दिला नाही. शेवटी या सामन्याचा निकाल शूटआऊटमध्ये लागला. ग्रेट ब्रिटेनकडून पहिला गोल जेम्स एलबेरीने केला. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने गोल करत गोलची बरोबरी केली. त्यानंतर झॅच वॅलासेने गोल करत भारताला २- १ न गोल करत ब्रिटनला २-१ ने आघाडी मिळवून दिलंय भारताकडून तिसऱ्या प्रयत्नासाठी सुखजीत सिंग आला. त्यानेही गोल करत भारताला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. ग्रेट ब्रिटनकडून विलियम्सन कोनोरचा प्रयत्न श्रीजेशने हाणून पाडला. त्याने गोल थांबवला. ज्यानंतर राजकुमार पालने गोल करत भारताला हा सामना १-१ (४-२ ) ने जिंकून दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -