सात दशकांनंतर आगामी साहित्य संमेलन होणार राजधानी दिल्लीत!

पुणे : सात दशकांनंतर आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यामुळे या संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्रदान केला जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


आगामी साहित्य संमेलनासाठी सात ठिकाणाहून निमंत्रण प्राप्त झाली होती. साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने मुंबई, दिल्ली आणि इचलकरंजी या तीन ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. स्थळ निवड समितीने सादर केलेल्या अहवालावर साहित्य महामंडळाच्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन आगामी साहित्य संमेलन दिल्लीला घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


साहित्य महामंडळाच्या या निर्णयामुळे सात दशकांनंतर राजधानी दिल्ली येथे साहित्य संमेलन होणार आहे. यापूर्वी १९५४ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. त्यामुळे तब्बल सत्तर वर्षांनी पुन्हा एकदा मराठी भाषेचा डंका दिल्लीत वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

Comments
Add Comment

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील