Chandrapur crime : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या घरी सापडली काडतुसे!

तलवार आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील केली जप्त


चंद्रपुरात वाढत्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी टाकली धाड


चंद्रपूर : चंद्रपुरात गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ (Chandrapur crime) झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली आहे. त्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुरात ठाकरे गटाचे (Thackeray Group) युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे (Vikrant Sahare) यांच्या घरात काडतुसांचा (Cartridges) साठा सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या घरात पोलिसांनी ४ तास केलेल्या छापेमारीत तलवार आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील केली जप्त करण्यात आली आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबारांच्या घटनांत वाढ झाल्यामुळे पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही युवक येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील विक्रांत सहारे यांच्या घरात ४ तास शोध अभियान राबवलं होतं.


विक्रांत सहारे यांच्या घरी ७.६५mm ची एकूण ४० काडतुसे सापडल्यामुळं पोलीस देखील चक्रावले आहेत. काडतुसांसह एक तलवार, १ मक्झिन आणि बेसबॉल बॅटसह, वाघनखे देखील जप्त करण्यात आली आहेत. सहारे यांच्यासह चंद्रपूर शहराच्या बाबूपेठ भागातील रहिवासी असलेल्या निलेश पराते आणि अमोल कोलतवार नामक २ तरुणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सहारे यांच्या अटकेमुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.



विक्रांत सहारे व कुटुंबियांची चौकशी सुरु


विक्रांत सहारे व कुटुंबियांची चौकशी केली जात आहे. स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची माहिती घेतली. एवढ्या मोठ्या संख्येत काडतुसे सापडल्यावर पोलिसांना ही काडतुसे वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या शस्त्राचा माग काढावा लागणार आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये