Virar accident : विरारमध्ये भीषण अपघात! कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू

विरार : राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण मोठी समस्या बनत चालली आहे. पुणे आणि वरळीच्या हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतरही राज्यात ठिकठिकाणी हिट अँड रनच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. त्यातच आता विरारमधूनही (Virar Accident) धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा कासट असं प्राध्यापिकेचं नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील ४५ वर्षीय प्राध्यापिका आत्मजा कासट या गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाविद्यालय सुटल्यावर विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप येथील आपल्या राहत्या घरी पायी जात होत्या. मुलजीभाई मेहता शाळेसमोरुन त्या जात होत्या. तेवढ्यात मागून एक भरधाव फॉर्च्युनर गाडी आली आणि आत्मजा यांना गाडीने धडक दिली.


या धडकेमुळे आत्मजा दुभाजकावर जाऊन पडल्या. त्यांना कारचालकाने तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, रात्री उशिरा गुन्हा दाखल करुन, शुभम पाटील या कारचालकाला अटक केली आहे.

Comments
Add Comment

पवईमध्ये कार अपघातात मजुराचा मृत्यू, अपघातानंतर निवृत्त अधिकाऱ्याने दाखवली माणुसकी

मुंबई: पवई पोलिसांनी एका ७४ वर्षीय निवृत्त संरक्षण अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या

सॅमसंगचा नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम१७ लाँच

मुंबई : कोरियन टेक दिग्गज सॅमसंगने आज भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय एम-सिरीज अंतर्गत नवीन बजेट स्मार्टफोन

मशिदीवरील भोंग्यामुळे गुन्हा दाखल! 'अजान'साठी स्पीकर वापरणाऱ्या दोघांवर कारवाई

मुंबई: पश्चिम उपनगरातील एका मशिदीत 'अजान' (प्रार्थनेसाठी आवाहन) देण्यासाठी भोंग्याचा (लाउडस्पीकर) वापर

"पर्वत डगमगणार नाही!"…राजकीय वादळावर मंत्री योगेश कदम यांचं कठोर प्रत्युत्तर

मुंबई : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या विरोधात सुरू असलेल्या राजकीय कटकारस्थानांवर जोरदार प्रहार केला

गोरेगाव पशुवैद्यमल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता

ॲड. अशिष शेलार यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई उपनगरातील पशुप्रेमींना दिलासा!. मुंबई : गोरेगाव येथील मुंबई

मेट्रो ३ मुळे शाळेचा प्रवास झाला सोपा; विद्यार्थ्यांसाठी तिकिटात सवलत देण्याची मागणी

मुंबई : ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ चा अनेक प्रवासी खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. अशातच,