Ladki Bahin Yojana : आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म होणार एका झटक्यात अपलोड!

  1188

सरकारने सुरु केली 'ही' नवी वेबसाईट


मुंबई : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी महिलांच्या अंगणवाडी केंद्राजवळ मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहेत. मात्र ऑनलाइन अर्ज करताना काही तांत्रिक अडचणींमुळे ठिकठिकाणी महिलांचा खोळंबा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यामुळे महिलांना आता अर्ज करणे सोपे अधिक होणार आहे.


यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी नारी शक्तीदूत अ‍ॅप सुरू केले होते. मात्र या अ‍ॅपवर अनेकदा सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे. या नवीन वेबसाइटमुळे अर्ज अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी दिली आहे.


नव्या वेबसाईटद्वारे अर्ज भरण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, पासबुक, अर्जदार महिलेचा फोटो, जन्म प्रमाणपत्र आणि लग्न झाले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच २१ ते ६५ वयोगटातील महिला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करु शकणार आहेत. दरम्यान, याआधी नारी शक्तीदूत ॲपवरुन अर्ज करणाऱ्यांनी पुन्हा या संकेतस्थळावर अर्ज करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

पवन सावंत    August 3, 2024 06:36 PM

एकनाथ शिंदे साहेब लोकांना का तुम्ही पसवथा आहे मी aapply केला आहे फॉर्म तुम्ही आजुन पैसे पाठवले नाही बोगस आहे या नंतर कधी तुम्हाला ओट करणारं नाही

Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी