Kolhapur Rain : पावसाची मुसळधार! कोल्हापूरवर पुन्हा पुराचे सावट

नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा


कोल्हापूर : मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यातच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. संपूर्ण आठवडाभर पावसाची संततधार (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्यामुळे कोल्हापूरवर आणखी एकदा पूराचे सावट ओढले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या पावसामुळे ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच राधानगरी धरणही १०० टक्के भरल्यामुळे येथील ७ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणातून भोगावती नदीमध्ये ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यासोबत पंचगंगा नदी देखील धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे या पाणीपातळीत कधीही वाढ होण्याची शक्यता आहे, यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


दरम्यान, कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात पूरस्थिती अजूनही कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व नागरिक आणखी चिंतेत आले आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा, अशी विनंती शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना केली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित