मुंबई : येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav 2024) आगमन होणार आहे. या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात धाव घेतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने आधीच तिकीट बुकींग करण्यासाठी चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते. नागरिकांची मोठी गर्दी पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा (Special Railway) निर्णय घेतला आहे. रेल्वेनंतर आता एसटी (ST Bus) बसने देखील चाकरमान्यांचा प्रवास सुखाने आणि वेगाने होण्यासाठी जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये व्यक्तिगत आरक्षणासोबत गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरातही सवलत मिळणार आहे.
त्याचबरोबर या प्रवासादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर तिकीटे उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…