मुरुडमध्ये लोकन्यायालय : प्री लिटिगेशन ८७९ पैकी ३२ प्रकरणे निकाली

मुरुड : मुरुड दिवाणी व फौजदारी न्यायालय (क, स्तर) व मुरुड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै रोजी लोकन्यायालय घेण्यात आले.


सदर लोकन्यायालयात बीएसएनएल, महावितरण, बॅंक ऑफ इंडिया, मुरुड नगरपरिषद, पंचायत समिती, मुरुड न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी प्री लिटिगेशन असलेली एकुण ८७९ पैकी ३२ प्रकरणे निकाली निघाली.


मुरुड नगरपरिषदेची पाणीपट्टी-घरपट्टी, पंचायत समितीची कर वसुली, तसेच बँकांची कर्ज वसुली अशी एकुण रुपये १,१०,४८०/- वसुली करण्यात आली. तर दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण ६८ फौजदारी प्रकरणे व ०६ दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली.


लोकन्यायालयात पंच म्हणुन ॲड. डी. एन. पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलींद साळगांवकर, ॲड. संजय जोशी, ॲड. एम. जे. तांबडकर, ॲड. हुसेन, ॲड. अजित चोगले, ॲड. कुणाल जैन, रेवदंडा पोलीस ठाण्याचे डी. डी. काकडे, मुरुड पोलीस ठाण्याचे डी. के. पाटील, सहाय्यक अधिक्षक शीला काठे, मतीन अधिकारी वरिष्ठ लिपीक व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र