कर्जत मध्ये पावसाची संततधार, अनेक गावे वाड्या यांचा संपर्क तुटला

शाळा महाविद्यालये यांना सुट्टया जाहीर


कर्जत(नरेश कोळंबे)- कर्जत तालुक्यात तसेच लोणावळा खंडाळा घाटात ढगफुटी सदृश पाऊस पडत असून कर्जत खोपोली परिसरात सगळीकडे पाणी भरायला सुरुवात झाली आहे . लोणावळा येथून टाटा धरणातून पातळ गंगा नदीत सुद्धा अविरत विसर्ग होत आहे त्यामुळे सदरील सर्व भागांना धोक्याचा इशारा दिला आहे. याच धर्तीवर कर्जत मध्ये सुद्धा प्रशासन जागृत होत शाळा महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


२४ तारखेपासून कर्जत परिसरात संततधार पाऊस चालू आहे त्यामुळे उल्हास नदी तुडूंब भरून वाहत आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे सगळ्या सखल भागात पाणी साठले आहे व त्यामुळे कर्जत मधील अनेक गावांचा रस्ता पाण्याखाली गेल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. विद्यार्थी वर्गाने ह्या परिस्थितीत वाईट परिस्थिती ला सामोरे जाऊ नये म्हणून प्रशासन जागरूक झाले असून सर्व शाळा व महाविद्यालये यांना सुट्टीचे आदेश पारित केले आहेत.



ज्या ज्या गावांचा संपर्क तुटला त्या गावांमध्ये बीड खांडपे, कोंडीवडे सालपे , नेरळ दहिवली, अंथरट वरेडी , वावे बेंडसे आदि गावांचे रस्ते पाण्याने भरले असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.याच धर्तीवर प्रशासनाने सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह