Indapur News : इंदापूर मार्गावर शेकडो वर्षे जुने वडाचे झाड कोसळले; वाहतूक ठप्प!

पाच तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटविण्यास यश


मुरुड : पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोर धरला असून अजूनही काही भागात मुसळधार पाऊस सुरुच आहे. मात्र अनेक ठिकाणी या पावसाचा जोरदार फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाऱ्याच्या वेगासह आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी इमारतीचा भाग कोसळत आहे तर अनेक ठिकाणी झाडे झुडुपही कोसळल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आज पहाटे सहाच्या सुमारास मुरुड रोहा इंदापूर (Indapur) मार्गावर भलेमोठे वडाचे झाड (Banyan tree) कोसळल्याची (Collapsed) माहिती मिळत आहे.


मुरुड रोहा इंदापूर मार्गावरील खार आंबोली भागात शेकडो वर्षे जुने असलेले वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे याठिकाणी रोह्याकडे जाणारी वाहतूक केळघर या पर्यायी मार्गावर तर इंदापूर, माणगाव, म्हसलाकडे जाणारी वाहने राजपुरी मार्गे वळविण्यात आली होती.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरुड नगरपरिषद प्रशासन दाखल झाले. तसेच स्थानिक ग्रामस्थ व दोन जेसीपीच्या मदतीने हे भले मोठे वडाचे झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. जेसीपी व दोन कटर मशिनच्या सहाय्याने अवघ्या पाच तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटविण्यास यश आले असून दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Comments
Add Comment

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

काय सांगता ? २८० किलोच्या हिंदकेसरी कॅप्टन बैलाची इतक्या लाखांना विक्री

छत्रपती संभाजीनगर : फक्त २८० किलो वजन, चमकदार शरीर, मजबूत बांधा, वेगवान चाल यामुळे संपूर्ण मराठवाड्यात लोकप्रिय

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळाला शासकीय पूजेचा मान!

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त परंपरेनुसार आज पहाटे विठ्ठलाची शासकीय पूजा पार पडली. यावर्षी

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती