Sindhudurga news : आंबोलीत पर्यटनासाठी गेलेल्या दोन तरुणांच्या दुचाकीचा भीषण अपघात!


एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी





सिंधुदुर्ग : पावसाळी पर्यटनासाठी (Monsoon tourism) गेलेल्या पर्यटकांसोबत घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे कळूनही तरुणांची हुल्लडबाजी सुरुच आहे. धबधबे तसेच वाहत्या पाण्याच्या टोकावर, दरीच्या कड्यावर उभे राहून तरुण सेल्फी घेताना, फोटोसेशन करताना दिसतात. अशातच आता आज आणखी एक धक्कदायक घटना सिंधुदुर्गातून समोर आली आहे. आंबोलीत (Amboli) वर्षा पर्यटनासाठी (Monsoon Tourism) गेलेल्या युवकाचा दुचाकी घसरल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.





याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गेलेले दोन मित्र कावळेसाद पर्यटन स्थळावरून येत असताना दुचाकी घसरून दुसऱ्या चार चाकी गाडीला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुडाळच्या सिद्धेश गोसावी याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी अक्षय म्हाडगूत हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Kokan Railway trains : कोकण रेल्वेच्या पाच गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा मिळण्याची शक्यता!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसंदर्भात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत संगमेश्वर रेल्वे स्थानकासाठी दिलासादायक

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक