Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसाठी गुड न्यूज, टीम इंडियात मिळाली संधी

Share

मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सिलेक्शन कमिटीने या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता तो वनडे संघाचा भाग झाला आहे. यासोबतच बीसीसीआय त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टही देऊ शकते.

श्रेयस अय्यरला वनडे संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच बीसीसीआय लवकरच त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करू शकते. अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता. तो टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. अय्यरने या दौऱ्यात एकच वनडे सामना खेळला होता आणि ५२ धावा केल्या होत्या. दरम्यान तो पुन्हा पुनरागमन करू शकतो.

श्रेयस अय्यरचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिल्यास त्याने आतापर्यंत ५९ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने टीम इंडियासाठी २३८३ धावा केल्यात. अय्यरने ५ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट वनडे स्कोर १२८ इतका आहे. अय्यरने भारतासाठी ५१ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान ८ अर्धशतक लगावले.

Recent Posts

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

6 minutes ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

7 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

58 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago