NCP case Supreme court : राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश!

अजित पवार गटाला दोन तर शरद पवार गटाला एका आठवड्याची मुदत


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) फूट पडून एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सर्वोच्च निकाल आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ नाव आणि 'घड्याळ' हे चिन्ह बहाल केलं. तर शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, शरद पवार गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.


सुप्रीम कोर्टाकडून अजित पवार गटाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचा असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी तो दाखल करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित

US Visa Interview : अमेरिका जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; व्हिसा इंटरव्ह्यू अपॉइंटमेंटवर अनिश्चित काळासाठी ब्रेक

नवी दिल्ली : अमेरिकेला जाण्याचे नियोजन करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी