Dengue : नाशकात डेंग्यूचे थैमान! आठवड्याभरात १०० हून अधिक जणांना प्रादुर्भाव

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक आजार डोकावत असतात. अशातच नाशिक शहरात (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue) साथीने थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा तब्बल १०४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये सिडको विभागात ३७ रुग्ण तर नाशिकरोड विभागात २२ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६ रुग्ण, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ४६९ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. मात्र तरीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.



डेंग्यूची लक्षणे


डेंग्यू ताप आल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला अचानक थंडी वाजून येते. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. अशक्तपणा, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणे, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच