Warkari pension : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ’ची स्थापना


मुंबई : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. अशातच विठठ्लाच्या नावाचा गजर करत पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘वारकरी महामंडळ’ची (Warkari Mahamandal) स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत आता पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना (Warkari pension yojana) सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


राज्य सरकार परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन लागू करणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.


वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. महामंडळाचं भांडवल ५० कोटी इतकं असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे.



काय आहे वारकरी महामंडळाचं उद्दिष्ट?


महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल. प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून वारकरी महामंडळाच्या आदेशाची प्रत वारकऱ्यांना देण्यात आली आहे.



मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?



  • सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.

  • आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.

  • वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.

  • कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.

  • पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.

  • चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.

Comments
Add Comment

Babasaheb Patil : ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना उद्या कर्जमाफीचा लाभ मिळणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेधारकांची यादी जाहीर होणार मुंबई (Mumbai):

Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना १० लाखांची आर्थिक मदत

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत (Moshi Garbage Depot Accident) मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या

बिबट्याच्या दहशतीचा अखेर अंत! ११ बकऱ्या, एका वासराचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला

PMFBY : महाराष्ट्रात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून,

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून

Heart-wrenching incident in Nagpur : शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना