Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना १० लाखांची आर्थिक मदत

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत (Moshi Garbage Depot Accident) मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.


महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली असून, मृत सन्नी माने, राहुल गायकवाड, वामन कसबे आणि यापूर्वी अक्षय सावंत यांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. (Moshi Garbage Depot Accident)



सन्नी माने यांच्या पत्नी मनीषा माने आणि आई फौजिया अझीम माने यांच्या खात्यात प्रत्येकी ५ लाख रुपये जमा करण्यात आले. राहुल गायकवाड यांच्या पत्नी भाग्यश्री गायकवाड यांच्या खात्यात ५ लाख रुपये, तर आई सरस्वती गायकवाड आणि वडील अर्जुन गायकवाड यांच्या खात्यात प्रत्येकी २.५० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. वामन कसबे यांच्या पत्नी सुमन कसबे यांच्या खात्यात संपूर्ण १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. (Moshi Garbage Depot Accident)


यापूर्वी अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या वारसांच्या खात्यातही १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली होती.



दरम्यान, दुर्घटनेतील इतर मृत भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या कायदेशीर वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही नियमानुसार प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. (Moshi Garbage Depot Accident)

Comments
Add Comment

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Nitin Gadkari : पुणे ते संभाजीनगर २ तासांत, तर मुंबई-बंगळुरू अवघ्या ५ तासांत! नितीन गडकरींनी मांडला महामार्गांचा 'मास्टर प्लॅन'

पुणे : महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक व्यवस्था अधिक गतीमान करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

History of Ukadiche Modak : गणपती बाप्पा आणि मोदकाचं अतुट नातं! काय आहे उकडीच्या मोदकाचा पौराणिक आणि रंजक इतिहास?

मुंबई : गणेशोत्सव असो वा संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी 'मोदक' हा अग्रस्थानी असतो. लहानपणापासूनच

Auto Driver Marathi Test : ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास, ३० दिवसांची अंतिम मुदत

मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात