Accident news : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहने एकमेकांवर आदळली!

वाहनांचा चक्काचूर तर ११ ते १२ जण जखमी


नाशिक : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली असून अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कसारामधून (Kasara) आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) कसारा घाटात ५ वाहने एकमेकांवर विचित्र पद्धतीने आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला असून ११ ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली. नवीन कसारा घाटत कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. तसेच घाटात धुकं असल्यामुळे वाहनाचा अंदाज आला नाही आणि तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली गेली. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.


सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही, परंतु कसारा घाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या