Shivsena controversy : खऱ्या शिवसेनेचा फैसला आता आणखी लांबणीवर!

सर्वोच्च न्यायालयाने दिली 'ही' तारीख


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर कधी होणार सुनावणी?


नवी दिल्ली : शिवसेना पक्षात (Shivsena) फूट पडून अवघी दोन वर्षे उलटली मात्र अद्याप खरी शिवसेना कोणाची, यावर ठोस फैसला झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षाचे मूळ नाव व चिन्ह बहाल (Shiv Sena Name and Symbol) केले, तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर 'मशाल' हे चिन्ह मिळालं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयात १५ जुलै रोजी सुनावणी पार पडणार होती, मात्र आता ही सुनावणी महिनाभर लांबणीवर पडणार नाही. नवीन तारखेनुसार आता खऱ्या शिवसेनेचा फैसला १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.


आमदार, खासदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता १४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं भवितव्य एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे. या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



आमदार अपात्रता प्रकरणावर कधी होणार सुनावणी?


तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shiv Sena MLA disqualification case) निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही बाजूंच्या आमदारांना पात्र ठरवले होते. विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.


यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवली होती. आता सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर येत्या २३ जुलैला सुनावणी होणार आहे. २३ जुलैला ही सुनावणी झाल्यास ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवावी की उच्च न्यायालयात पाठवावी, याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या