Anant-Radhika Wedding : अंबानींच्या लग्नात चमकली मराठमोळी 'गुलाबी साडी'!

वातावरण गुलाबीमय करण्यासाठी संजू राठोडला अंबानींचं खास निमंत्रण


मुंबई : सध्या देशभरातच नव्हे तर विदेशातही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा आहे. जगातील आतापर्यंत सर्वात महागडा ठरलेला हा शाही विवाहसोहळा आहे. या सोहळ्याला अंबानींनी बॉलिवूडसह देश-विदेशातील अनेक कलाकार मंडळींना आमंत्रण दिलं. यात एक आनंदाची बाब म्हणजे डोळे टिपवून टाकणाऱ्या या सोहळ्यात मराठमोळ्या मुलाचं मराठमोळं गाणंदेखील वाजलं आणि त्यावर सर्वांनी ठेका धरला. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या संजू राठोडचं 'गुलाबी साडी' (Gulabi sadi by Sanju Rathod) हे गाणं अंबानींच्या लग्नात वाजलं. यासाठी अंबानींनी संजूला खास निमंत्रणही दिलं होतं.


काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गुलाबी साडी' या गाण्याने सिनेसृष्टीतल्या सगळ्यांनाच भुरळ घातली. सोशल मीडियावर तर अनेकांनी या गाण्यावर रील्स बनवले. अगदी माधुरीपासून ते अनेक दिग्गजांना या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. आता यातून अंबानी कुटुंब (Ambani Family) देखील सुटलेलं नाही. अनंत अंबानींच्या लग्नात थेट संजू राठोडने उपस्थिती लावली आणि अंबानी कुटुंबियांसह उपस्थितांनी गुलाबी साडी या गाण्यावर ठेका धरला.





आयपीएलमध्येही गाजलेली गुलाबी साडी


गुलाबी साडी या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे. या गाण्याला आतापर्यंत २०५ मिलियन्सहून अधिक व्ह्यूज आहेत. हे गाणं लाईव्ह ऐकण्यासाठीही चाहते तितकेच आतुर होतात. आयपीएलच्या हंगामात स्टेडियमवरही संजून हे गाणं गायलं होतं. त्यानंतर आता संजूला थेट अंबानींकडून देखील निमंत्रण मिळालं. यावेळी लग्नमंडपात संजूने गुलाबी साडी हे गाणं गायलं आणि वऱ्हाडींनी त्याच्या गाण्याच्या तालावर ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर संजूचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. त्यावर अनेकजणांनी कमेंट्स करत संजूचं कौतुक देखील केलं आहे.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या