Amravati Accident : अमरावतीमध्ये भीषण अपघात! भरधाव बसने चौघांना चिरडले

एकाच कुटुंबातील तीन जण जखमी, एकाचा मृत्यू


अमरावती : सातत्याने देशभरात अपघाताच्या (Accident News) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अमरावती शहरातूनही एक धक्कादायक (Amravati Accident) माहिती समोर आली आहे. एका भरधाव बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले असून चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सध्या जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज साडे अकराच्या सुमारास अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. या घटनेनंतर बस ड्रायव्हर घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सध्या घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



जखमींची माहिती


या अपघातामध्ये प्रीतम गोविंद निर्मळे (९) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. प्रीतम बसच्या पुढच्या चाकाखाली आला. तर नर्मदा निर्मळे (६० वर्षे), वैष्णवी संजय निर्मळे आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामुळे निर्मळे कुटुंबावर दु:ख पसरले आहे.

Comments
Add Comment

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

Crime News : प्रेमासाठी मित्रानेच मित्राची केली हत्त्या ; मुलगी एक प्रियकर दोन अन् पुढे...

नवी मुंबई : प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असत हे आजवर आपण ऐकत आलो आहे मात्र हे कधी सत्यात होताना पाहिलं आहे का?

Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस 'वर्षा'वर घेणार भाजप आमदारांची 'शाळा'

- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मांडणार 'रिपोर्ट कार्ड'; पक्षीय कामात उदासीनता दाखवणाऱ्यांचे कान टोचणार मुंबई :

TET Exam 2026: TET परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा केंद्रावर लागू झाले नवे नियम

TET Exam 2026 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यंदा अधिक कडक नियमांसह घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा

राज्यात २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार- कृषी मंत्री दत्तात्रय

Murlidhar Mohol Father passes away : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; आज पुण्यात अंत्यसंस्कार

पुणे: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ