Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस 'वर्षा'वर घेणार भाजप आमदारांची 'शाळा'

- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मांडणार 'रिपोर्ट कार्ड'; पक्षीय कामात उदासीनता दाखवणाऱ्यांचे कान टोचणार


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या सोमवारी (२२ जून) सायंकाळी सात वाजता आपल्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्र्यांसमोर सर्व आमदारांचे 'रिपोर्ट कार्ड' (कामगिरीचा ताळेबंद) मांडणार आहेत. विशेष म्हणजे, अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना अनेक आमदार सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्याची गंभीर दखल पक्षनेतृत्वाने घेतली असून, अशा आमदारांचे या बैठकीत कान टोचले जाणार आहेत.



पक्षपातळीवरून दिल्या गेलेल्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांकडे आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांकडे अनेक आमदार दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 'एसआयआर' मोहीम तसेच बूथ प्रमुखांच्या (बीएल-२) नियुक्त्या करण्याकडे अनेक आमदार आणि काही खासदारांनीही पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाचा अत्यंत महत्त्वाचा आणि थेट जनतेशी जोडणारा उपक्रम असलेल्या पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या स्थानिक आयोजनातही अनेक आमदारांनी प्रचंड उदासीनता दाखवल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व बाबींचा लेखाजोखा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाणार आहे.



पूर्णवेळ उपस्थित न राहणाऱ्यांना मिळणार तंबी


अधिवेशनादरम्यान आमदारांची सभागृहातील उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, अनेक आमदार केवळ हजेरी लावून किंवा ठरावीक वेळेतच सभागृहात थांबत असून पूर्णवेळ बसत नसल्याचे पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आले आहे. आगामी काळात मतदारसंघात पक्ष टिकवून ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींची ही अशी वृत्ती पक्षाला परवडणारी नाही, हाच मुख्य संदेश या बैठकीतून दिला जाणार आहे. त्यामुळे 'वर्षा'वरील या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आमदारांची नेमकी कशी 'शाळा' घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील